वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

1. माय वर्चुअल दुकान ग्राहक संघाची उद्दिष्टे काय आहेत ?

          1.       ग्राहकांना त्यांच्या लोकल एरियातील दुकानदारांकडून डिस्काउंट कार्डद्वारे डिस्काउंट मिळवून देणे.

          2.       ग्राहकांना आपल्या एरियातील विविध सर्विसेसची माहिती माय वर्चुअल दुकान ॲप मार्फत उपलब्ध करून देणे.

          3.       ग्राहकांना हवे असलेल्या प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेसच्या किमती बिडींग द्वारे दुकानदारांकडून ॲपवर उपलब्ध करून देणे.

          4.       माय वर्चुअल दुकान ग्राहक संघाच्या ॲपला जुडलेल्या दुकानदारांकडून केलेल्या खरेदीवर किंवा घेतलेल्या सर्विसेस वर तीन टक्के किंवा अधिक लॉयल्टी पॉइंट्स ग्राहकांना मिळवून देणे.


2. माय वर्चुअल दुकान ग्राहक संघाचे डिस्काउंट कार्ड कुठे कुठे चालणार ?

          1.       माय वर्चुअल दुकान ग्राहक संघ डिस्काउंट कार्ड ग्राहक संघाला जुडलेल्या विविध क्षेत्रातील दुकानदारांकडे चालणार.

          2.       उदाहरणार्थ किराणा दुकान, कपड्याची दुकाने, मेडिकल्स, हॉटेल्स, इलेक्ट्रॉनिक दुकाने, इलेक्ट्रिकल्स दुकाने अशा विविध शंभरहून अधिक क्षेत्रातील ॲप वर जुडलेल्या दुकानदारांकडे चालणार.


3. दुकानदार किती टक्के कॅश डिस्काउंट देतील व किती टक्के लॉयल्टी पॉइंट्स देतील ?

                  कॅश डिस्काउंट चे टक्के - दुकानदार ठरवतील.

                  लॉयल्टी पॉइंट्स चे टक्के - ग्राहकांनी केलेल्या पेमेंट्सवर फिक्स तीन टक्के व दुकानदाराने तीन टक्क्याहून अधिक लॉयल्टी पॉईंट्स डिक्लेअर केले असतील तर ते अधिक चे टक्के.

                  तात्पर्य :- दुकानदार त्यांच्या व्यवसायाच्या प्रकारानुसार व मार्केट मधील स्पर्धेनुसार कॅश डिस्काउंट देतील अथवा देणार नाहीत. परंतु माय वर्चुअल दुकान ग्राहक संघाला जुडलेल्या (अपवाद वगळता) दुकानदारांना तीन टक्के लॉयल्टी पॉइंट्स हे बंधनकारक आहेत व ते ग्राहकांना द्यावेच लागणार. कमीत कमी तीन टक्के लॉयल्टी पॉइंट हा ग्राहक संघाला जुडलेल्या ग्राहकांचा अधिकार आहे.


4. ग्राहकांनी जमवलेल्या लॉयल्टी पॉईंट्स चे उपयोग काय ?

                  ग्राहकांनी विविध दुकानदारांकडून केलेल्या खरेदीवर जमा केलेले लॉयल्टी पॉइंट्स माय वर्चुअल दुकान ग्राहक संघाकडे Redeem करायचे व त्या बदल्यात ग्राहकांना जमा असलेल्या पॉईंटच्या MRP ची किचन वेअर मधील वस्तू ग्राहक संघाकडून फ्री मिळणार. ग्राहक वस्तू आपल्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकतात.


5. ग्राहक जमवलेले लॉयल्टी पॉइंट्सचे कॅश मध्ये रूपांतर करू शकतात का किंवा इतर दुकानदारांकडे वापरू शकतात का ?

                  :- नाही.


6. किती पॉईंट्स जमल्यावर ग्राहक माय वर्चुअल दुकान ग्राहक संघाकडून किचन वेअर मधील फ्री वस्तू मिळवण्यास पात्र ठरतील ?

                  पहिली फ्री वस्तू मिळवण्यासाठी ग्राहकांचे कमीत कमी १००० पॉईंट्स जमायला हवेत. त्यानंतर ग्राहक 200 पॉईंट्स च्या वर फ्री वस्तू मिळवण्यास पात्र ठरतील.


7. लॉयल्टी पॉइंट्स कसे क्लेम करायचे व जमा असलेले लॉयल्टी पॉइंट्स ची माहिती कुठे दिसणार ?

                  लॉयल्टी पॉइंट्स क्लेम करण्यासाठी प्रथम तुम्ही आपल्या ग्राहक संघाचे मेंबर असणे आवश्यक आहे.

                  स्टेप-१ ॲपवर लॉगिन करा

                  स्टेप-२ Account बटनावर क्लिक करा तिथे तुम्हाला loyalty Points tag दिसेल त्यावर क्लिक करा.

                  स्टेप-३ Claim Loyalty Points बटन क्लिक केल्यावर loyalty Points Claim form ओपन होणार त्यामध्ये दुकानदाराची आयडी टाका, तुम्ही दुकानदाराला केलेले पेमेंट ची amount टाका व Submit बटन क्लिक करा. तुमची request submit झालेली तुम्हाला दिसेल. परंतु तुम्ही टाकलेली request दुकानदार accept करतील त्यानंतर ती ग्राह्य धरली जाणार व redeem करण्यास पात्र ठरणार.